IMPIMP

Amruta Fadnavis | ‘…तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात’ – अमृता फडणवीस

by nagesh
Amruta Fadnavis | people look me through different lens amruta fadnavis strong opinion song

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गणेश वंदना’ या शिर्षकाखाली हे गाणे प्रदर्शित झाले आहे. भक्ती म्हणजे सेवा हा संदेश अमृता फडणवीस (Amrita Fadanvis) यांनी या गाण्यातून दिला आहे. त्यांच्या या गाण्यासंदर्भात सोशल मीडियातील ओव्हरव्ह्यू बद्दल (Overviews on social media) विचारणा केली असता, त्यांनी परखडपणे प्रत्युत्तर दिले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी गाण्यापासून ते राजकारणापर्यंतच्या (Politics) विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या नवीन गाण्यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात. मी एक भाजप नेत्याची (BJP leader) पत्नी आहे, म्हणून मी काहीही केलं किंवा म्हटलं तर या लोकांना वाटतं की, मी तेथून प्रेरणा घेऊनच हे करत आहे. पण, माझ्या ट्विटरवरील ज्या कमेंट असतात, त्या माझ्या विचारधारानुसार असतात. मला वाटलं की असं लोकांपुढे म्हणायचं आहे, तर ते ट्विट केलेलं असतं. माझा भाजपकडे कल आहे, किंवा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी आहे, म्हणून ते लिहित नाही, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच गाणे हे माझे फॅशन आहे, त्यामुळे मी गणं करत असते, असेही त्यांनी म्हटलं.

‘गणेश वंदना’ कोविड योद्ध्यांना समर्पित

अमृता फडणवीस या गायन क्षेत्रामध्ये करिअर करत आहेत. त्यांची अनेक गाणी आजपर्यंत रिलीज (Songs releas) झाली आहेत. आपल्या गाण्यामधून त्या सामाजिक विषयांवर भाष्य करीत असतात. त्यांचे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘गणेश वंदना’ या गाण्यातून त्यांनी एक सुंदर मेसेज दिला आहे. कोरोना (Corona) काळातील कोविड योद्ध्यांना हे गाणं त्यांनी समर्पीत केले आहे. या गाण्यात अमृता फडणवीस डॉक्टरच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title : Amruta Fadnavis | people look me through different lens amruta fadnavis strong opinion song

हे देखील वाचा :

Crime News | गणेशोत्सवात बड्या बिल्डरच्या फार्महाऊसवर जुगाराचा टेबल ‘गरम’, 85 लाखाची रोकड जप्त तर 11 जण ताब्यात

T-20 World Cup 2021 | विराट कोहली कर्णधार पदावरुन ‘पायउतार’ होणार; रोहित शर्मा भारताचा कर्णधार?

Shiv Sena | महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य; मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षीत शहर

Related Posts