IMPIMP

Anil Deshmukh And Sachin Waze | ED ने सोडवले पूर्ण ’कोडे’, सांगितले कशाप्रकारे सचिन वाझेने माजी गृहमंत्री देशमुख यांच्यापर्यंत पोहचवले कोट्यवधी रुपये

by bali123
anil deshmukh and sachin waze | sachin waze collected rs 4 7 cr in cash from bar owners for anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh And Sachin Waze | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) ईडीकडे (ED) आणखी एक मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझेच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सचिन वाझेने ईडीला सांगितले की, त्याने मुंबईतील बार मालकांकडून 4.70 कोटी रुपये रोख गोळा केले होते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या PS कडे सोपवले होते.

’नंबर 1’ पर्यंत पोहचले पैसे

ईडीने (ED) हा सुद्धा दावा केला की मुंबई पोलीसांच्या क्राईम इन्टेलिजन्स युनिट (CIU) चे
प्रमुख सचिन वाझे यांनी बार मालक आणि मॅनेजर्सला सांगितले की,
हा पैसा नंबर 1 ला आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच (Mumbai Police Crime Branch) आणि सामाजिक सेवा शाखेला जाईल.
वाझेने एजन्सीला सांगितले की, त्यास पोलीस तपासाच्या अनेक प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून थेट निर्देश मिळत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ईडीने मुंबईत स्पेशल प्रिव्हेन्शन मनी लॉन्ड्रिंग कोर्टात आपल्या रिमांड अर्जात आरोप केले होते
आणि देशमुख यांचे पीए संजीव पालांडे (Sanjeev Palande) (51) आणि पीएस कुंदन शिंदे (PS Kundan Shinde) (45) यांच्या कोठडीची मागणी केली होती,
ज्यांना शनिवारी अटक (Arrest) करण्यात आली होती.
कोर्टाने दोघांना एक जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.

दोन हप्त्यात पोहचले पैसे

ईडीने आरोप केला की, वाझेने म्हटले आहे की,
त्याने डिसेंबर 2020 पासून फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान बार मालकांकडून सुमारे 4.70 कोटी रुपये जमवले होते
आणि ते अनिल देशमुख यांच्या निर्देशाने त्यांचा पीए कुंदन संभाजी शिंदेकडे जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 च्या महिन्यात दोन हप्त्यात सोपवले होते.

Web Titel :- anil deshmukh and sachin waze | sachin waze collected rs 4 7 cr in cash from bar owners for anil deshmukh

Related Posts