IMPIMP

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’

by nagesh
Anil Deshmukh-Anil Parab | Top secret meetings was happened between deshmukh and parab for maharashtra police officer transfers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh-Anil Parab | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता परमबीर सिंह यांनी ईडीसमोर (ED) आणखी एक धक्कादायक जबाब नोंदवला आहे. सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह देशमुख यांची नावे घेतली आहेत. सचिन वाझेला (Sachin Vaze) खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्र्यांचा दबाव असल्याचा देखील त्यांनी आरोप केला. (Anil Deshmukh-Anil Parab)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बडतर्फ पोलिस अथिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी देशमुख यांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचे पुढे वाझे याने सांगितले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या जबाबात नोंदवला आहे. सचिन वाझे हा त्याच्याकडील तपासाधीन गुन्ह्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांना देत होता. पुढे वरिष्ठांकडून ती माहिती मला दिली जायची अथवा वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन माहिती देत होते. असं परमबीर यांनी ईडीकडे (ED) नोंदविलेल्या जबाबात म्हटले आहे. (Anil Deshmukh-Anil Parab)

गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली असलेल्या समितीमध्ये मी सहभागी होतो. पोलीस बदल्यांमध्ये याद्या तयार करण्यात आल्यानंतर फक्त नावासाठी याद्या समितीसमोर येत होत्या.
तसेच मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या याद्याही गृह मंत्रालयातून येत होत्या.
यातील काही याद्या परमबीर यांनी ईडीला दिल्या आहेत.
तसेच परमबीर यांनी या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा देखील आरोप केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यानंतर आता भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी शंका उपस्थित करत ट्वीट केलं आहे की, “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं ?, असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

Web Title :- Anil Deshmukh-Anil Parab | bjp atul bhatkhalkar on former home minister anil deshmukh shivsena anil parab former mumbai cp parambir singh

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

Related Posts