IMPIMP

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

by pranjalishirish
anil deshmukh bjp prakash javdekar target thackeray government over param bir singh allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्यावर 100 कोटी वसुल करण्याचा धक्कादायक आरोप केला. मुंबई उच्च न्यायालयाने आरोप गंभीर असल्याचा ठपका ठेवत सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे भाजपला आघाडी सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील नेत्यांनी आणि केंद्रातील मंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

मोठी बातमी ! अजित पवार, हसन मुश्रीफ यांना मिळाली ‘ही’ नवी खाती

अनिल देशमुख  Anil Deshmukh यांच्या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, अनिल देशमुख यांच्या राजीनामा मुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं आहे, असा टोला महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील राज्यातील ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. स्वतंत्र भारतात असे कधीही घडलेले नाही. आता या प्रकरणात अनेकांची नावे पुढे येतील. उद्धव ठाकरे सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.

देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोर वाढला; भाजपच्या ‘या’ नेत्याची मागणी

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर त्यांना क्लिनचीट देणं हे न समजण्यासारखं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन त्यात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना रामदास आठवले म्हणाले, गृहमंत्री अनिल देशमुख यांना यापूर्वी राजीनामा देण्याची गरज होती. मात्र, त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, आता शरद पवार यांनी अनिल देशमुखांना Anil Deshmukh  राजीनामा देण्यास परवानगी दिली ही चांगली बाब आहे, असे रामदास आठवले म्हणाले. आता असे वाटू लागले आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण  करु शकणार नाही, असेही आठवले म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

राजीनामा देताना अनिल देशमुख काय म्हणाले ?

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये काल  दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तरी मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, असे राजीनामा पत्रात म्हटले आहे.

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

काय आहे 100 कोटींचे प्रकण ?

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांकडून कमावण्याीच सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही  भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

Related Posts