IMPIMP

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

by nagesh
Anil Parab | anil parab office in mhada colony demolished thakceray camp get aggressive against mhada and kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Anil Parab | १०० कोटी वसुली प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून (mumbai high court) तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने सोमवारी ते स्वतःहून ईडी कार्यालयात हजार झाले. त्यानंतर त्यांची तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली. यावेळी दिल्लीतून आलेल्या अधिकार्‍यांनीही त्यांची चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजपच्या दोन नेत्यांनी ट्विटरद्वारे मोठा दावा केला. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर असल्याचे म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सोमवारी मध्यरात्री भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि आमदार नितेश राणेंनी (nitesh rane) यासंदर्भात मध्यरात्री ट्विट केली आहेत. सोमय्या यांनी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ट्विट करत ‘अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने (ED) अटक केली. १०० कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब (Anil Parab) असं म्हटलं आहे.

त्या पाठोपाठ मध्यरात्री २ च्या सुमारास भाजप आमदार नितेश राणेंनीदेखील ‘अनिल देशमुख… हॅप्पी दिवाली! अनिल परब.. मेरी ख्रिसमस?? असं सूचक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर ‘नवाब मलिक आणि संजय राऊतांचे विशेष आभार’, असंही राणेंनी खोचकपणे ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Web Title: Anil Parab | anil parab will be next bjp leader kirit somaiya and nitesh rane tweets after anil deshmukh arrest

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी

Lok Sabha By-Election Results | दादरा-नगर हवेलीत भाजपला झटका ! शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय

Pankaja Munde | ‘कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यांत संस्कार’ – पंकजा मुंडे

Related Posts