IMPIMP

अण्णा हजारे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंकेंवर ‘खूश’ ! म्हणाले…

by bali123
anna hazare praises ncp-mla nilesh lanke

सरकारसत्ता ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna hazare) यांनी राष्ट्र्वादी काँग्रेसच्या स्थानिक आमदाराच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी जरी त्यांचं पटत नसलं तरी त्यांनी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. यावेळी बोलताना लंके यांच्या जीवनकार्यावर कोणी पुस्तक लिहिणार असेल, तर त्याचा सर्व खर्च आपण करू, असंही अण्णा anna hazare म्हणाले आहेत.

आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारे यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एक पुस्तकही त्यांना भेट म्हणून दिलं.

‘तहान भूक विसरून समाजसेवेसाठी वाहून घेतलंय, ते झपाटून काम करताहेत’
यावेळी बोलताना अण्णा anna hazare म्हणाले, आमदार लंके यांचं काम, विचार, त्यांचा सामाजिक व राजकीय दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या पाठीमागे आपण लागतो. परंतु लंके यांच्या मी पाठीशी आहे. त्यांना अनेक वर्षांपासून मी जवळून पाहतो आहे. शुद्ध विचार, आचार, निष्कलंक जीवन हे त्यांनी सांभाळलं आहे. तहान भूक विसरून समाजसेवेसाठी वाहून घेतलं आहे. ते झपाटून काम करत आहेत.

‘लंकेंच्या जीवनकार्यावर कोणी पुस्तक लिहिणार असेल, तर सर्व खर्च मी करेन’
पुढं बोलताना अण्णा म्हणाले, त्यांच्या या जीवनकार्यावर पुस्तक झालं पाहिजे. त्यांच्यावर असं पुस्तक लिहिण्यासाठी कोणी पुढं येणार असेल तर स्वागतच आहे. यासाठी लागणारा खर्च मी स्वत: करेन. पारनेर तालुक्याला असा आमदार पूर्वीच मिळायला हवा होता. लंके यांच्याप्रमाणेच इतर आमदारांनीही कामं केली पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, बाबाजी तुरटे, सुरेश पठारे, दादासाहेब पठारे, दत्ता आवारी, योगेश मापारी, संभाजी वाळूंज आदी उपस्थित होते. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नीलेश लंके प्रथमच पारनेरचे आमदार झाले आहेत. तेव्हापासून त्यांचा हजारे यांच्याशी चांगला संपर्क आहे.

सोलापुरात राष्ट्रवादीत दिसतोय ‘उत्साह’, पण शिवसेनेला ‘मरगळ’ !

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts