IMPIMP

काँग्रेसला धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याने सोडला ‘हात’, मनगटावर ‘घडयाळ’ बांधण्याची तयारी

by pranjalishirish
Pune NCP | NCP's complaint to Anti Corruption Bureau (ACB) Pune against corruption in various projects in Pune Municipal Corporation

तिरुअनंतपुरम : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेस Congress, तृणमूल काँग्रेसह इतर पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच विविध नेत्यांचे ‘आउटगोईंग’ चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नेते पी. सी. चाको यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी नेतेमंडळींकडून जोर लावला जातो. मात्र, निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली, असा आरोप पी. सी. चाको यांनी काँग्रेसमधून Congress बाहेर पडताना केला. चाको यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असला तरी ते कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे संकेत दिले जात आहेत. तसेच त्यांना नव्या पक्षात कोणती जबाबदारी मिळणार याकडेही लक्ष लागले आहे. चाको यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, यापूर्वी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पी. सी. चाको हे पक्ष सोडून गेलेले दुसरे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिले.

काँग्रेसमध्ये लोकशाही उरलेली नाही

काँग्रेसमध्ये Congress आता लोकशाही उरलेली नाही. निवडणुकीच्या मैदानात उतरवल्या गेलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत राष्ट्रीय काँग्रेस कमिटीशी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवला आहे, असेही ते म्हणाले.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts