IMPIMP

देवेंद्र फडणवीसांना अटक करा, राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

by nagesh
arrest opposition leader bjp devendra fadnavis ncp leader rupali chakankar demand home minister

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – एका प्रकरणात पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. हे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथे जाऊन सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

आम्ही काय मौजमजेसाठी ऑक्सिजन मागतोय का?
राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावे, असे केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले होते. त्याचा समाचार घेत चाकणकर म्हणाल्या, गोयल यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही काय मौजमजेसाठी ऑक्सिजन मागतोय का? ऑक्सिजनच्या अभावी आमच्या मायबाप जनतेला मरणयातना भोगाव्या लागत आहे. त्यामुळेच आम्ही ऑक्सिजन मागत आहे. तरीही तुम्हाला ते देता येऊ शकत नाही तर असले सरकार आपल्या देशात काय कामाचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Also Read :

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts