IMPIMP

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळाताहेत’

by nagesh
Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Ashish Shelar | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वातावरणात अनेक जोरदार चर्चा पाहायला मिळत आहेत. मागील दीड वर्षापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये (Mahavikas Aghadi and BJP) सतत धूसफूस पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजप नेते (BJP) आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठं भाकीत केलं आहे. महाविकास आघाडीतील 3 पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील 2 पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाकीत शेलार यांनी केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आशिष शेलार (Ashish Shelar) हे आज (शुक्रवारी) पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये (Maval taluka) आले होते.
त्यावेळी बोलताना शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्देशून बोलत त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.
तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात.
या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल.
असं त्यांनी म्हटलं आहे. तर, महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याची टीका देखील आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर केली आहे.

दरम्यान, पुढं बोलताना आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर, मावळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे बाजीप्रभू आहेत. बूथ प्रमुखच भाजपच्या यशाचा मानकरी आहे.
देशातील भाजपचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत.
भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असं करु नका.
ते तुमच्या हिताचं नाही. जो बेकायदेशीर काम करत होता, तो गृहमंत्री असला तरी आता वॉन्टेड आहे.
पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत. असं देखील शेलार यांनी म्हटलं आहे.

Web Title : Ashish Shelar | MLA Ashish Shelar’s suggestive statement, says – ‘BJP is getting signals from 2 parties in maharashtra’

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | ‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

Maharashtra Police News | पोलीस अधीक्षकांचा कारवाईचा बडगा ! कर्तव्यात कसूर करणाऱ्या 123 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Jayant Patil | ‘मी पुन्हा येईन’.. या वाक्यावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

Related Posts