IMPIMP

Ashish Shelar | ‘परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार, ते सापडले तर सरकारचं पितळ उघडं पडेल’; आशिष शेलार यांचा आरोप

by nagesh
Ashish Shelar | thackeray government helps param bir singh to escape from india alleges bjp leader and mla ashish shelar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीचे आरोप (Allegations of ransom) करुन राज्य सरकारला (Maharashtra Government) अडचणीत आणणारे व सध्या गायब असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या गायब होण्याने भाजपने (BJP) राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी परमीर सिंग गायब होण्यामध्ये राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray government) असल्याचा आरोप केला आहे. तसेच परमबीर सिंग सापडले तर ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडेल. यामागे मोठे कटकारस्थान असल्याचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत परमीबर यांचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारवर (Central Government) आरोप केले होते.
परमबीर रस्ते मार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो.
त्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं होतं.
नवाब मलिक यांचे आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोडून काढले आहेत.

परमबीर सिंग महाराष्ट्र सरकारचा जावई आहे का ?

आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक हे कपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग यांच घर महाराष्ट्रात आहे.
रेशन कार्ड, आधार कार्ड माहाराष्ट्रातील आहे.
मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याचं उत्तर राज्यातील सरकारने द्यायला हवं.
महाराष्ट्रात अशी कोणती एजन्सी आहे आणि असे कोण लोक आहेत.
जे परमबीर यांना मदत करत आहेत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की राज्याचे मुख्यमंत्री (CM)
किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही.
परमबीर हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय, असा सवाल शेलार यांनी केला.

… तर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार

परमबीर सिंगची मालमत्ता का जप्त केली गेली नाही ? लुकआउट नोटीसला (Lookout notice) उशीर का झाला ?
परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली ? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करुन घेतल्यात.
ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती.
परमबीर पळून गेलाच असेल तर यास महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) जबाबदार असल्याचे शेलार यांनी म्हटले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तो सापडला तर पितळ उघडं पडेल

परमबीर सिंगकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. तो सापडला तर सरकारचं पितळ उघडं पडेल, त्यामुळंच सरकार त्याला पळायला मदत करतंय.
हा एक मोठा डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला. विदेशात त्यांना राजकीय आश्रय मिळावा यासाठीही ठाकरे सरकार प्रयत्न करत असावं.
अशी शंका देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

Web Title : Ashish Shelar | thackeray government helps param bir singh to escape from india alleges bjp leader and mla ashish shelar

हे देखील वाचा :

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरण ! सॅम डिसोझाने केला धक्कादायक खुलासा; सुनील पाटीलने पार्टीची घेतली होती माहिती

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मालमत्तेवर ‘टाच’?

Related Posts