IMPIMP

Assembly Monsoon Session | … म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचंच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे पत्रानेच उत्तर

by bali123
Governor Bhagat Singh Koshyari | only in three days thackeray mahavikas aghadi government issue 160 gr governor bhagat singh kishori asks for disclosure to government

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी (Assembly Monsoon Session Duration) वाढवावा, विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) निवड इत्यादी विषयासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 24 जून रोजी पत्र पाठवले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्यपालांना पत्र पाठवून दोन दिवसांचे अधिवेशन का बोलावले याचा खुलासा केला आहे. (CM Uddhav Thackeray Wrote letter to Governor Bhagat Singh Koshyari about Assembly Monsoon Session)

‘या’मुळे अधिवेशन दोन दिवस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले
की, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची (Working Advisory
Committee) बैठक 22 जून रोजी झाली. कोविड-19 (Covid-19) मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (Delta and Delta Plus variant) संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी (Task Force Expert) व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने (Central Government) दिलेल्या सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीत विचारविनिमय झाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यानुसार केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी (duration of the convention) ठरवण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन, सन 2021 च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाचा कालावधी (Assembly Monsoon Session Duration) 5 आणि 6 जुलै असा दोन दिवसांकरिता निश्चित केला आहे, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी पत्रातून केला आहे.

तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता

राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसरी लाट (Corona third wave) येण्याची तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी, केवळ आपल्या राज्यापुरतीच नाही तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

यामुळे अध्यक्षांची निवडणूक घेता आली नाही

भारतीय संविधानाच्या (Indian Constitution) कलम 178 तसेच महाराष्ट्र विधानसभा नियम (Maharashtra Assembly Rules), 6 अन्वये विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker) निवड करण्यात येते. तथापी, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच (Maharashtra) नाही तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आली नाही, असा खुलासा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रातून केला आहे.

घटनात्मक अडचण नाही

या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Assembly Vice President Narhari
Zirwal) यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ही
(Budget session) त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडले. यामुळे निवडणुकीत अभावी कोणत्याही
सांविधानिक तरतुदींचा भंग (Violation of constitutional provision) झालेला नाही अथवा
घटनात्मक अडचण (Constitutional difficulty) निर्माण झालेली नाही, असे ही पत्रात म्हटले
आहे.

Web Titel : Assembly Monsoon Session | cm uddhav thackeray reply governors bhagat singh koshyari letter assembly monsoon session

Related Posts