IMPIMP

‘महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेले हल्ले मुख्यमंत्र्यांनी थांबवावेत’ – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

by sikandershaikh
Ramdas Athawale | Praise of Ramdas Athawale from Nagpur for giving employment to PM Modi through poetry

नांदेड :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)thackeray government | नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवनी गावात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून बौद्ध समाजातील कुटुंबावर हल्ला करण्यात आला. बौद्ध कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 23 फेब्रुवारी रोजी लोहा शहरात बंद पुकारण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर अनेक अंबेडकरवादी नेत्यांनी शिवनी गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज शिवनी गावात जाऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

शिवनी गावातील संदीप दुधमल हे शेतातून सायकलवर घरी जात होते. त्यावेळी त्याच गावातील दोघेजण दुचाकीवरुन जात होते. दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी संदीप यांच्या सायकलला धडक दिली. यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी संदीप यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संदीपच्या घरी जाऊन आई, वडील, भाऊ, चुलता, चुलती, बहिण यांना घरात घुसून मारहाण केली.

घरातील लोकांना मारहाण सुरु असताना हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या गणेश येडकेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालण्यात आला.
यामध्ये गणेश हा गंभीर जखमी झाला.
यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. याच वादातून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा गावात पोहचला. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.
तर इतर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी शोधपथके रवाना केली. तसेच गावातील लोकांना शांततेचं आवाहन केलं.

आज केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवनी गावाला भेट दिली.
यावेळी त्यांनी बौद्ध कुटुंबावर झालेल्या सामूहिक हल्ल्याप्रकरणी घटनास्थळी भेट देऊन पिडितांची भेट घेतली.
महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेले हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवावेत.
त्यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार (thackeray government) दलितांवर हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे, असे आठवले यांनी म्हटले.

Ex PM डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण, म्हणाले- मोदी सरकारचा ‘तो’ निर्णयच जबाबदार

Related Posts