IMPIMP

‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला

by bali123
awhad fadnavis word war ncp leader jitendra awhad slams bjp devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील लॉकडाऊनच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांना विस्मरणाचा रोग झाल्याचे म्हटले होते. त्यावरून आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. ’20 लाख कोटी हे मी शब्दांत लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कमकुवत असल्याने काही जमत नाही’, असे ते म्हणाले.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी भाष्य केले. तसेच त्यांनी लॉकडाऊनचा इशाराही दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांच्यावरही टीका केली होती. ‘जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज दिले’, असे त्यांनी म्हटले होते.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये ते म्हणाले, ’20 लाख कोटी हे मी शब्दांत लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कमकुवत असल्या कारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्या कारणाने ह्या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितले तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन.

दरम्यान, फक्त एवढंच तुम्हाला आठवणीने सांगतो, की केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली वैद्यकीय सामुग्री पीपीई किट, व्हेंटिलेटर इ. वैद्यकीय सामानही काही दिवसानंतर देण्याचे बंद केले होते. एवढे माझ्या स्मरणात आहे, असेही जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी सांगितले.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts