IMPIMP

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न; फक्त ‘या’ तीनच नेत्यांचीच उपस्थिती

by bali123
balasaheb thackeray memorial bhoomi pujan program cm uddhav thackeray ajit pawar present

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा कार्यक्रम आज संपन्न झाला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला काही मोजक्याच नेतेमंडळींची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे राजकीय स्तरावरून टीका केली जात आहे.

बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतील तीन प्रमुख नेते उपस्थित होते. पण त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही नेत्यांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे अनेकांनी यावरून टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग असल्याचे चित्र निर्माण झाले.

दरम्यान, कुलाबा येथे काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले होते. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी फक्त महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सरकारमधील पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिल्यावरून टीका केली जात होती.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

राज ठाकरेंनाही निमंत्रण नाही
बाळासाहेब ठाकरेंचे balasaheb thackeray पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. त्यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली. ‘सरकार पडण्याची भीती होती म्हणून इतक्या घाईत भूमिपूजन सोहळा करून घेतला.’

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts