IMPIMP

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

by pranjalishirish
balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation

संगमनेर : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, लसींचा तुटवडा, ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्याला आता काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते संगमनेर येथे वार्ताहरांना बोलत होते.

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat  म्हणाले, “राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काय आरोप केले त्याला महत्व देत नाही. ते आरोप करण्याची आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाचा प्रसार एकट्या नगरमध्ये नसून सगळीकडे हीच स्थिती आहे. मृत्यूदर वाढत असून, ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही.”

“कठोर निर्बधांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना संसर्गित रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्वाचे आहे. जोपर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृतांची संख्या वाढते ही वस्तुस्थिती असून, आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील,” असे थोरात यांनी सांगितलं.

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

हातावर पोट असलेल्यांची अवस्था बिकट

“टाळेबंदीमुळे व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. कोरोना जागतिक पातळीवरील संकट असून, मानवतेवर आलेले संकट आहे. या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे,” असेही थोरात  Balasaheb Thorat यांनी नमूद केलं.

Read More : 

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

Related Posts