IMPIMP

Bandatatya Karadkar | बंडातात्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपच्या तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – ‘परिणाम भोगायला तयार रहा’

by bali123
Ajit Pawar | CM uddhav thackeray chief minister had said that we will fight the elections together but it was not possible due to political issues ajit pawar

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Bandatatya Karadkar | कोरोना महामारीच्या (Corona epidemic) पार्श्वभूमीवर शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. त्याचबरोबर आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुकांसोबत पंढरपूरकडे वारीसाठी (Pandharpur Wari) विशेष वाहनाद्वारे प्रतिबस २० भाविक याप्रमाणे दोन बसमध्ये एकूण ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही ह भ प बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी पायी वारीवर ठाम राहिले त्यांनी मागितलेली परवानगीही प्रशासनाने नाकारली. पण बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आज सकाळी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी दिघी पोलिसांनी (Dighi Police) त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. वडमुखवाडी-चऱ्होली येथे बंडातात्या याना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या घटनेवरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, बंडातात्यांना अटक (Bandatatya) करायला ठाकरे सरकारला (Thackeray Government) लाज कशी काय वाटली नाही. हे सरकार मुघलांपेक्षाही अत्याचारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी आता परिणाम भोगायला तयार रहावं असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या (Alandi Palkhi Sohala) पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी आळंदीच्या नगराध्यक्षांसह ३७ (Alandi Mayor) वारकरी (Warkari) बाधित आढळले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. प्रशासनाने आळंदी किंवा देहू येथे वारकऱ्यांनी गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन केले. त्याच बरोबर पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी (Police Bandobast) तैनात करण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असताना डेल्टा प्लस (Delta Plus) चे नवे संकट ओढवले आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून (State Government) अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर्षीही कोरोनाच्या सावटातच अनेक अनेक धार्मिक सण उत्सव पार पडणार आहेत. राज्य सरकारनं (State Government) आषाढी वारीसाठीही (ashadi wari 2021) नियमावली जारी केली असून मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी (Pandharpur Wari) दाखल होण्याची परवानगी दिली आहे.

राज्यातील मानाच्या १० पालख्यांच्या सोहळ्यास परवानगी

देहू (Dehu) व आळंदी (Alandi) येथील प्रस्थान सोहळ्यांस (Dehu and Alandi Prasthan Sohala) प्रत्येकी १०० व अन्य आठ पालख्यांच्या सोहळ्यास प्रत्येकी ५० वारकऱ्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर सहभागी शंभर टक्के वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या (ashadi wari 2021) प्रस्थान सोहळ्यानंतर पादुकांसोबत पंढरपूरकडे (Pandharpur) वारीसाठी विशेष वाहनाद्वारे प्रतिबस २० भाविक याप्रमाणे दोन बसमध्ये एकूण ४० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. श्री संतांच्या पादुका विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पुढे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास परवानगी दिली आहे.

Web Title : Bandatatya Karadkar | bjp leader tushar bhosale has warned state government after bandatatya karadkar was arrested police

Related Posts