IMPIMP

Belgaum : राष्ट्रवादीचा महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा ! ‘फडणवीस दिल्लीकरांना खुश करण्यात व्यस्त’; जयंत पाटलांचा टोला

by Team Deccan Express
Jayant Patil | NCP leader jayant patil taunt BJP leader devendra fadnavis over the kashmir files movie

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळेक यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि जलंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करुन देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम केल्याचा आरोप जयंत पाटील jayant patil यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील jayant patil म्हणाले, भाजप मागील पाच वर्षात महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करुन भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा हल्लबोल जयंत पाटील यांनी केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा देताना पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच इथल्या मराठी भाषकांना, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शुभम शेळके यांना पाठिंबा देत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ यांनी अनेकदा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलन केले. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम रहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो. हा पाठिंबा म्हणजे त्याचाच एक भाग असल्याचे जयंत पाटील jayant patil यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे
देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीकरांना खुश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे काही बरं वाटेल तेच ते करत असतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. कोरोना असेल, राज्यातील इतर मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे. पण तसे होताना दिसत नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts