IMPIMP

राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत वर्षभरात मोठी वाढ ! भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं दिले तब्बल 5 कोटी ?

by amol
ncp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Legislative Assembly Election 2019) अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडल्या. यानंतर राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Indian National Congress) आणि राष्ट्रवादी (Nationalist Congress Party – NCP) यांची महाआघाडी होऊन राज्यात त्यांचं सरकार स्थापन झालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) ला राज्यात झालेल्या सत्तेचा फायदा होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेला मिळणाऱ्या देणगीत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीला (NCP) 2019-20 मध्ये 59.94 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.
आधीच्या वर्षांच्या तुलनेत आता देणगीत 5 पटीनं वाढ झाल्याचं दिसत आहे.
एका इंग्रजी वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे.

निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची माहिती देणं अनिार्य करण्यात आल्यापासून राजकीय पक्ष त्या त्या आर्थिक वर्षातील माहिती निवडणूक आयोगाला देत असतात.
राष्ट्रवादीला 2018-19 मध्ये 12.05 कोटींच्या तर 2019-20 या वर्षात 59.94 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत.

असंही समजत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देणगीदारांमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याचाही समावेश आहे.
भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या लोढा डेव्हलपर्स कंपनीनं राष्ट्रवादी काँग्रेसला 5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर भाष्य करत म्हटलं आहे की,
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांचा स्विकार केला जातो आणि याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते.
त्यामुळं संशय घेण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकरांवर 6 फ्लॅट बळकावल्याचा आरोप, हायकोर्टानं दिलं ‘हे’ निर्देश

Related Posts