IMPIMP

माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

by pranjalishirish
bijali-malla-former-mla-sambhaji-pawar-passed-away-sangli

सांगली : बिजली मल्ल आणि माजी आमदार संभाजी पवार Sambhaji Pawar यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले आहे. कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक,पंजाब ,हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता.

आज दुपारी 12 वाजता त्याच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. 1 वाजता मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे. ते दीर्घकाळ आजाराने त्रस्त होते. स्व. वसंतराव दादा पाटील  यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेत पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती.

कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ते विधानसभेत आवाज उठवत असतं. जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही संभाजी पवार Sambhaji Pawar  यांच्यावर सोपवली होती. भाजपमध्ये 2009 मध्ये त्यांनी प्रवेश केला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा परिवार आहे.

Also Read :
‘सचिन वाझेंची तात्काळ नार्को टेस्ट करा, खरा चेहरा समोर येईल’ – राम कदम

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Sachin Vaze : मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकारी NIA च्या रडारवर ?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

Related Posts