IMPIMP

BJP | भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा दरोडा’

by nagesh
rajya sabha election bjp mla laxman jagtap came in ambulance to vote for rajya sabha election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP | ”राणीच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे. भाजपचे कोषाध्यक्ष, आमदार मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha), मुंबई महापालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा (Vinod Mishra), नगरसेविका राजश्री शिरवाडकर (Corporator Rajshri Shirwadkar) यांच्याकडून हि मागणी करण्यात आली आहे. संबधित निविदा प्रक्रिया न थांबवल्यास भाजप आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. (BMC)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”BJP ने मुंबई महापालिकेतील (BMC) रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे 136 कोटी रुपये वाचविले. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. 100 कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे 2 भाग केले आहे.” असं मिहीर कोटेचा (MLA Mihir Kotecha) यांनी सांगितलं आहे.

पुढे कोटेचा म्हणाले की, ”या निविदेत गैरप्रकार होत असून निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविले होते. विनोद मिश्रा यांनीही 21 ऑक्टोबर रोजी असेच पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले होते. 29 नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी 106 कोटी जादा रकमेची निविदा सादर केलीय. 188 कोटींच्या बोलीसाठी 294 कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत.”

दरम्यान, ”याबाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) लेखी तक्रार केली असून या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे निवृत्त उपायुक्त हे ‘भ्रष्टाचाराचे महामार्ग’ तयार करत आहेत असा आरोपही भाजपने केला.
तसेच ”मी फक्त बिल्डर नाही तर माझी शिपींग कंपनीही आहे.
माझं दुबईत रेस्ट्रॉही आहे. माझे अनेक उद्योग व्यवसाय आहेत.
जे काही आहे ते सर्व इलेक्शनच्या शपथपत्रावर लिहिलं आहे.
तुम्ही पूर्ण माहिती घ्या, तुम्ही एक रूपयाचं ही काही काढलं तरी चालेल.
तुमची सत्ता आहे प्रशासन तुमच जे काही शक्य आहे ते सगळ करा,” असं उत्तर मिहीर कोटेचा यांनी महापौरांना (BMC Mayor) दिलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- BJP | 106 crore robbery of penguin gang in rani baugh says bjp mihir kotecha

हे देखील वाचा :

Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4094 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anurag Thakur | ‘अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी’ – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

Allu Arjun Film | ‘पुष्पा’ नंतर अल्लू अर्जुनचा 2020 चा चित्रपट प्रजासत्ताक दिनी होणार हिंदीत प्रदर्शित, पहा चित्रपटाचा टीझर

Related Posts