IMPIMP

BJP And MNS | ‘भाजपा- मनसे युतीचे वारे? ‘माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो’; जाणून घ्या कोण-कोणाला काय म्हणालं

by bali123
BJP and MNS | it being speculated bjp and mns will form alliance upcoming elections

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) अनेक वर्ष एकत्र येत लढा देणारी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपाची (BJP) युती अखेर तुटली. सत्तेसाठी कायपण.. म्हणत शिवसेनेने गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ टिकलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन केलं. यामुळे आता भाजप सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे सरकारला कोणत्याही मुद्यावरून धारेवर धरताना पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप (BJP) आणि MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) युती होण्याचे संकेत मिळत असल्याचे समजते.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यांवरून उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजपा मनसे सोबत युती करण्यास तयार नव्हता. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मागील काही दिवसांपूर्वी जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो असं म्हटलं होतं. परंतु, आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनीच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना म्हटलं की, त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंक देखील राज ठाकरे त्यांना पाठवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, शिवसेना पक्षानं काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान गेल्याच वर्षी मनसेने पक्षाचा झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केलीय. आता आगामी निवडणुकीत मनसेबरोबर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा असून, ठाणे, नवी मुंबई, नाशिक याचबरोबर मुंबई, यासारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील अशीही माहिती मिळत आहे.

‘आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो,
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तर मोठं नेतृत्व आहे.
राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासंदर्भात भाजपा कोअर टीम निर्णय घेईल,
असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते.
या दरम्यान आता चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
तर राज ठाकरे हे आता नाशिक, पुणे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीत आहेत.
मात्र, मुख्यतः म्हणजे अशा गाठीभेटी होत आहेत.
यावरून मनसे- भाजप एकत्र येतील का? आणि मुळात म्हणजे राज ठाकरे भाजपचा हात धरेल का? हे बघणे महत्वाचे आहे.
हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा उमटू लागल्या आहेत.

Web Title :- BJP and MNS | it being speculated bjp and mns will form alliance upcoming elections

Related Posts

Leave a Comment