IMPIMP

BJP : ‘संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात’

by Team Deccan Express
mp navneet rana may be in trouble as mva government can order inquiry about allegation of loan from yusuf lakdawala

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसह बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सरु आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने bjp प्रतिष्ठेची केली आहे. तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत  यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासाठी बेळगावमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावर भाष्य केले होते. यावरुन भाजपने bjp गसंजय राऊत यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

संजय राऊत म्हणाले होते, बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका. मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत sanjay raut यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, संजय राऊत यांना बेळगाव, इंग्लंड, अमेरिका यांची माहिती आहे. आम्ही सामान्य माणसं आहोत. राऊत नितीन गडकरी यांना सल्ला देऊ शकतात, असा टोला लगवाला. नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाला असला, तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगाव येथे प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवा विझण्यापूर्वी जास्त मोठा होतो
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन आहे. आठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गलेले परत येणार आहेत. दिवसा स्वप्न पाहायला कुणाला अडचण नाही. मात्र भाजप पूर्वीपेक्षा जबरदस्त होत चाललेली आहे. सामान्य लोकांना माहिती आहे, की कुठल्याही क्षणी सरकार जाऊ शकते, अशा दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. दिवा विझण्यापूर्वी जास्त मोठा होतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts