IMPIMP

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

by pranjalishirish
Kirit Somaiya on INS Vikrant | bjp leader kirit somaiya challege to thackeray government

शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांच्याविरोधात 100 कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबतचा हा खटला दाखल आहे. किरीट सोमैया यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळं आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी किरीट सोमैयांकडून या गोष्टी रचण्यात आल्या आहेत असा दावा देखील रवींद्र वायकर यांनी केला आहे. आता खटला दाखल केल्यानंतर किरीट सोमैया यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे जेलमध्ये असल्यानं उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलं आहे असा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला

‘सचिन वाझे जेलमध्ये असल्यानं उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलं’

किरीट सोमैया Kirit Somaiya  म्हणाले, सचिन वाझे जेलमध्ये बंद आहे. त्यामुळं त्यांच्याकडून येणारे 100 कोटी मिळणार नाहीत. म्हणून बहुतेक उद्धव ठाकरेंनी वायकरांना यावेळी सोमैयांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलं. अशा धमक्यांना आम्ही भिक घालत नाही अशी टीका त्यांनी केली. इतकंच नाही तर सचिन वाझेसह सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी केला आहे.

‘…रवींद्र वायकरांचा 100 कोटींचा दावा. वाह रे ठाकरे सरकार’

सोमैया Kirit Somaiya  यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, संजय राऊत यांची शेवटची चेतावणी, प्रताप सरनाईक ची 100 कोटींची नोटीस, रवींद्र वायकरांचा 100 कोटींचा दावा. वाह रे ठाकरे सरकार.

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी वन कायद्याचा भंग, वन जमिनीवर अतिक्रमण केल्याचा सोमैयांचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लाई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमैया यांचा आरोप आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी 3 मार्च रोजी रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. जमिनीच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमैया यांनी तक्रारीत केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमैयांचा आरोप आहे.

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘थोडा अभ्यास करत चला !’

अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचा आणि ही माहती निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा सोमैयांचा दावा

अलिबागमध्ये कोर्लाई येथील जमिनीवर 19 बंगले असल्याचा आणि ही माहती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला आहे. तसंच मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून 25 कोटींचा मोबदला मिळाल्याचा दावाही सोमैया यांनी केला आहे.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

उद्योजक महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनाावलं, म्हणाले – ‘…म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत

Related Posts