IMPIMP

भाजपाचे शिवसेनेला चॅलेंज, म्हणाले – ‘बंदुक भी तेरी, गोली भी तेरी, तारीख भी तेरी… सुबह हो या शाम…’

by nagesh
bjp leader ashish shelar challenges to shivsena bmc elections maratha reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिश शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने कटकारस्थान करणे सुरु केल्याचा आरोप शेलारांनी Ashish Shelar केला आहे. तसेच शिवसेना चार कारस्थानं रचत असल्याचे सांगत याबद्दल त्यांनी मुद्देसूद माहितीही दिली आहे. मंगळवारी (दि. 1) माध्यमांशी संवाद साधताना शेलारांनी सामनामध्ये हल्ली प्रसिद्ध डायलॉग्स वाचायला मिळतात. त्याच शैलीत मला उत्तर द्यायचे असल्याचे सांगत त्यांनी फिल्मी पद्धतीने शिवसेनेला चॅलेंज दिलं आहे. बंदुक भी तेरी, गोली भी तेरी, तारीख भी तेरी…सुबह हो या शाम…भाजपा शिवसेनाको हराने के लिए तैय्यार असे म्हणत भाजपने शिवसेेनेला चॅलेंज दिले आहे. निवडणुका जर युद्ध समजायच्या असतील तर आम्ही या युद्धासाठी तयार आहोत. भाजपा कायदेशीर मार्गाने निवडणुका लढवेल असेही शेलार Ashish Shelar यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरुन शेलारांनी Ashish Shelar शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. शेलार म्हणाले की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने शिवसेना कट रचत आहे. मुदतपूर्व निवडणुका, निवडणुका पुढं ढकलण्यासाठी करोनाचा बहाणा करणं, 2011च्या जनगणनेवर आधारित नवी प्रभाग रचना करणे, 30 प्रभाग फोडण्याचा प्रयत्न करणे असे शिवसेनेचे डाव आहेत, मात्र आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. नालेसफाईच्या नावाखाली शिवसेनेने मुंबईकरांचे 70 कोटी पाण्यात घातले आहेत. शिवसेना मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे वादा आठवा, बचावाचा दावा करु नका. सगळ्या सोयीसुविधा फक्त वरळीतच का…मुंबईतले इतर भाग शिवसेनेला दिसत नाहीत का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आपले हे गुण दाखवले आहे. त्याचबरोबर आपण कर्तृत्व परावलंबी असल्याचंही मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारनं दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.

Also Read:- 

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts