IMPIMP

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

by pranjalishirish
bjp leader atul bhatkhalkar slams shiv sena uddhav thackeray over balasaheb thackerays memorial

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- शिवसेनाप्रमुख shiv sena  दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (बुधवार) सायंकाळी पार पडणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या होत्या. असे असताना फडणवीस यांना सोहळ्याला आमंत्रित करण्यात न आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांच्या कर्यकाळात कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता. मात्र, आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. यावरुन भाजप नेत्यांनी शिवसेना shiv sena आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ‘कोत्या मनाचे पुन्हा दर्शन झाले’ असे म्हणत टीका केली आहे. तर नितेश राणे यांनी, ‘आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले निमंत्रण देवेंद्रजींना दिले असते’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत एक ट्विट केले आहे. ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन… निमंत्रण पत्रिकेतून ‘हिंदूहृदयसम्राट’ गायब, MMRDAचे एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे shiv sena स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब… नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची’, असे म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

तर आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत !’, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास, दादर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

‘बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सत्तावाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना-भाजप यांच्यामधील युती तुटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजपने सातत्याने शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. भाजपच्या काही नेत्यांनी ठाकरे कुटुंबीयांवरही टीका केली. सचिन वाझे प्रकरणात भाजपने विशेषत: फडणवीसांनी Devendra Fadnavis  उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे. आजच्या कार्यक्रमात फडणवीस यांना आमंत्रण न देण्यामागे हेही एक कारण असल्याची चर्चा आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts

Leave a Comment