IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांचा नाकर्तेपणा अन् स्थानिक प्रशासन मुजोर; राज्यात अक्षरश: अराजक माजले’, भाजपचा CM ठाकरेंवर हल्लाबोल

by Team Deccan Express
bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray over aurangabad saloon owner death

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सलून चालकाचा पोलिसांच्या कारवाई दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना औरंगाबाद येथील उस्मानपुरा येथे घडली आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसेच मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोनल केले होते. यावरुन आत राज्यात विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर atul bhatkhalkar म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे, अशी जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरश: अराजक माजले आहे, असे भातखळकर atul bhatkhalkar यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव फिरोज खान कदीर खान असे आहे. त्याने उस्मानपुरा येथील आपले हेअर सलून उघडले म्हणून पोलिसांनी कारवाई केली. त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना तो खाली पडून जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत फिरोजचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. फिरोजला मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. हा प्रकार समजल्यानंतर हजारो नागरिक आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा होत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. तसेच जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

Also Read :

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts