IMPIMP

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाले – ‘तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?’

by bali123
bjp leader chandrakant patil blame mahavikas aghadi goverments maratha reservation supreme court

सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( chandrakant patil ) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या मुद्द्यावरून  महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारनं मराठा आरक्षणासाठी कायदा केला. राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलं. त्या आयोगाचा अहवाल आला, त्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस मिळाली. हा कायदा हायकोर्टात टिकवला. तो टिकण्यासारखाच भक्कम बनवला. पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं ? असा सवालही पाटलांनी महाविकास आघाडीला केला आहे.

‘तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही’
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी या मुद्द्यावरून सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार राज्यात होतं. मात्र, तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्कानं घ्यायची. परंतु त्यांना आहे तसंच राहू द्यायचे. हेच तुमचं धोरण होतं.

‘महाविकास आघाडी सरकारनं सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला ‘
आणखी एका ट्विटमध्ये पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या नावानं राष्ट्रवादी-काँग्रेसनं महाराष्ट्रात एवढी वर्षे राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्याकडे पुढं जाणार नाही, याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आजवर घेतली आहे. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजप सरकारनं निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारनं सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला, असंही पाटील म्हणाले आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला’
पुढं बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही मराठा सामाजाला दिलेलं आरक्षण 102 व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचं आहे. आम्ही हे ठामपणे उच्च न्यायालयात मांडलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं. परंतु महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विषयाला फाटे फोडून मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

‘मराठा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून भाजप सदैव सहाकार्याच्या भूमिकेत’
चंद्रकांत पाटील असंही म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वत: देवेंद्रजींनी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचं कल्याण व्हावं म्हणून भाजप सदैव सहाकार्याच्या भूमिकेत आहे. आता तरी ठाकरे सरकारनं संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावलं उचलावीत आणि आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’, सचिन वाझेंच्या WhatsApp Status ने खळबळ

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! हुंड्यासाठी दबाव म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नाही

Related Posts