IMPIMP

चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘राठोड यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्री देणार राजीनामे ?’

by bali123
Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil criticised on mahavikas aaghadi govt run by only ncp ajit pawar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण राठोड यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्री राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केला आहे. त्यामुळे नेमक राज्याच्या राजकारणात काय घडणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटील chandrakant patil कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची मूळ लांबपर्यंत गेली असून सरकार तुमच असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कस काय करत आहेत, असा प्रतिसवाल पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणावरूनही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाचा अवमान करीत असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात लवकर निर्णय लागावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. एमपीएससी परीक्षा आणि नोकर भरती लांबणीवर पडल्याने मराठा समाजावर परिणाम होत असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पाटील यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांवर दररोज टीका करणारे असे राज्यकर्ते पाहिले नसल्याचा पलटवार केला आहे. पवार यांनी इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही असे विधान केले होते. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts