IMPIMP

‘इतकं सगळं करुनही अजित पवार छातीठोकपणे कसं बोलतात? त्यांच्यावर M.Phil करणार’; चंद्रकांत पाटलांचा टोला

by Team Deccan Express
bjp leader chandrakant patil strongly criticises ajit pawar

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर सडकून टीका करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘इतकं सगळं करुनही अजित पवार छातीठोकपणे कसं बोलतात ? याचं मला आश्चर्य वाटतं. त्याचा मी अभ्यास करणार आहे. शरद पवारांवरील माझी पीएचडी अपूर्ण आहे, पण अजित पवारांवर M.Phil करणार आहे’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

भगीरथ भालके यांच्यासाठी अजित पवार पंढरपुरात जोरदार प्रचार करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणारा जन्माला यायचा आहे, अशा शब्दात अजित पवारांनी भाजपवर हल्ला चढवला होता. या टीकेला चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे. अजित पवार यांना राज्यात कोरोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागत आहे. हा त्यांचा स्वभाव नाही तो शरद पवार यांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचे हे लक्षण आहे. ज्या प्रकारे ते बोलत आहेत. त्यावरुन त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी पायाखालची जमीन सरकते तेव्हा जीभेवरचा ताबा सुटतो, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

चंद्रकांत पाटील chandrakant patil पुढे म्हणाले, अजित पवार यांना काय झालं आहे हे माहित नाही. मात्र अलिकडच्या काळात ते जोरात आहेत. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, असा प्रकार आहे. कारण त्यांच्यावर सिंचनाच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एवढे केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री… उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील असा चिमटा पाटील यांनी काढला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts