IMPIMP

bjp leader devendra fadanvis | भाजपचा पुन्हा शिवसेनेसोबत जाण्यासाठी नकार? माजी मुख्यमंत्र्यांच्या विधानानं नवी चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

by bali123
bjp leader devendra fadanvis reaction on shivsena mla pratap sarnaik letter to cm uddhav thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी दोन पानाचे पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी भाजप (BJP) आणि मोदी (Narendra Modi) यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे राज्यातील समीकरणे बदलणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadanvis) यांनी आगामी काळात भाजप (BJP) शिवसेनेसोबत (ShivSena) जाण्यास इच्छुक नसून बहुमतासह आम्ही सत्तेत येऊ असे सांगितले आहे. bjp leader devendra fadanvis reaction on shivsena mla pratap sarnaik letter to cm uddhav thackeray

फडणवीस (devendra fadanvis) म्हणाले की, भाजपसोबत शिवसेनेने यावं अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. सरनाईकानी (Pratap Saranaik) त्यांच्या प्रमुखांना हे पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्यावर ते उत्तर देतील. राज्यातील जनतेचे प्रश्न सक्षमपणे विरोधी पक्ष म्हणून मांडत आहोत. गत निवडणुकीत (Election) आम्ही युती केल्यामुळे बहुमतापर्यंत पोहोचलो नव्हतो. मात्र आगामी निवडणुकीत स्वबळावर लढून बहुमतासह सत्तेत येऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

दरम्यान, शिवसेनेकडून भाजपसोबत जुळवून घेण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर भाजप वेट अँड वॉच या भूमिकेत असेल असे बोलले जात होते.
मात्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा दिल्याने युती करण्यास भाजप अनुकूल नाही की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब; नक्की काय म्हणाले प्रताप सरनाईक?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी दोन पानाचे पत्र किहिले आहे.
त्यामध्ये त्यांनी भाजप (BJP) आणि मोदी (Narendra Modi) यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचा नाहक त्रास होत असून युती केल्यास हा त्रास थांबेल, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर सत्तेत असलेले राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेस (Congress) आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत.
त्यामुळे आपला पक्ष कमकुवत होण्याऐवजी मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Tital : –bjp leader devendra fadanvis reaction on shivsena mla pratap sarnaik letter to cm uddhav thackeray

Related Posts