Devendra Fadnavis : ‘लवंगी होता तर ते एवढे घाबरले का?’

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी काल दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांना अहवाल दिला. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘भिजलेला लवंगी फटाका’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, की ‘दिल्लीत जाऊन काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की बॉम्ब हे लवकरच समोर येईल. तो लवंगी होता तर ते एवढे का घाबरले?’ असा सवाल उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दिल्लीत जाऊन दिलेल्या पुराव्यावर संजय राऊत म्हणाले होते, की ‘फडणवीस यांनी जी काही कागदपत्रे दिली आहेत. त्यामध्ये काडीचाही दम नाही. त्यांनी सादर केलेला तो बॉम्ब नाही तर भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातही नाही. आम्हीच दिल्लीत कुठे स्फोट झाला याच्या शोधात होतो’, अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता फडणवीस यांनी यावर पलटवार केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ‘दिल्लीत जाऊन काल जो अहवाल दिला तो लवंगी फटाका होता की मोठा बॉम्ब होता हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता तर ते एवढे का घाबरले? 25 ऑगस्ट 2020 पासून दाबून का ठेवला? यामधून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला’.
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला
दरम्यान, संजय राऊत हे सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे वक्तव्य हे अधिकृत वक्तव्य मानता येणार नाही. संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, एवढे मोठे नेते संजय राऊत नाहीत, असा टोलाही फडणवीस Devendra Fadnavis यांनी यापूर्वी लगावला होता. त्यानंतर आता हे विधान केले आहे.
Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव
‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका
ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका
धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल
Comments are closed.