IMPIMP

‘जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

by pranjalishirish
bjp leader girish mahajan criticized thackeray govt over anil deshmukh resign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयात काल (सोमवार) सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे सीबीआयला आदेश दिले. तसेच यामध्ये काही तथ्य आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपसह इतर पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक विधान करणारे ट्विट भाजप नेते गिरीश महाजन Girish Mahajan  यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

भाजपचे नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन Girish Mahajan  यांनी एकामागून एक तीन ट्विट करत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून त्यांच्या पापाचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे, असा दावा महाजन यांनी केला आहे.

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

जे समोर आले ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे

निगरगठ्ठ ठाकरे सरकारने अनिल देशमुख यांची पाठराखण केल्याने त्यांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा मोठी नाचक्की झाल्यानंतरचा आणि न्यायालयाच्या निर्देशानंतरचा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र, जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे, अजून बरेच काही समोर येणार आहे, असा हल्लाबोल महाजन  Girish Mahajan यांनी ट्विटद्वारे केली आहे.

कोर्टाच्या दणक्याने देशमुख यांचा राजीनामा

राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार आहेत. आगे आगे देखो… होता है क्या ? असे सांगत त्यांनी उच्च न्यायालयाने 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात देशमुख यांच्या सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची प्रचंड नाचक्की झाली आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला, असा टोला महाजन महाजन यांनी लगावला.

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

हे खंडणीबाजांचे सरकार

राज्यात कोरोनाचे संकट असताना सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाही, हे फक्त वसुली सरकार आहे. एका एपीआयला 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला हवा होता. भाजपच्या वतीन देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती, असेही महाजन यांनी सांगितले.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

Related Posts