IMPIMP

Pandharpur : पोटनिवडणुकीत कल्याणराव काळे ठरणार ‘किंगमेकर’, त्यांच्या भूमिकेवर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून, तालुक्याचे लक्ष

by bali123
bjp leader kalyanrao kale did not elaborate his role pandharpur

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर Pandharpur  विधानसभा पोटनिवडणुकीत अनेकांनी बंडाचे निशाण फडकवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असला तरी या निवडणुकीत भाजपचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या ते कोणत्याच पक्षांच्या बैठकीला उपस्थित रहात नाहीत. काळे अद्यापही तटस्थ असल्याने ते कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच या निवडणुकीत कल्याणराव काळे हे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, मित्र पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजप उमेदवाराच्या विरोधात कुटुंबातीलच सदस्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे. यातच कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे काळे यांच्या भूमिकेवर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

पंढरपूर Pandharpur  विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वत: निवडणुकीला सामोरे न जाता भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या मागे आपली शक्ती उभी केली आहे. परंतु भाजप नेते कल्याणराव काळे आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून चार हात लांब आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

कल्याणराव काळे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांचे तालुक्याच्या राजकारणात चांगले वजन आहे. त्यांच्याकडे दोन साखर कारखान्यांसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, दोन पतसंस्था, काही शैक्षणिक संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 60 हजारांहून अधिक मते मिळाली होती.

सुप्रिया सुळेंनी चिमटा काढत केलं मोदी सरकारचं अभिनंदन !

सध्या पंढरपूर Pandharpur  विधानसभा मतदारसंघातील 22 ग्रामपंचायतींमध्ये काळे गटाचे अनेक सदस्य निवडून आले आहेत. याच परिसरात साखर कारखान्याचे संचालक व कर्मचारी वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे काळे गटाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे 30 मार्च रोजी मेळावे झाले. मात्र, या मेळाव्यामध्ये काळे गटाचे कार्यकर्ते आणि खुद्द कल्याणराव काळे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

कल्याणराव काळे हे काही दिवसांपासून भाजपपासून दूर गेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला आहे. असे असले तरी कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. कल्याणराव काळे कोणाला पाठिंबा देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसेच त्यांच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर Pandharpur  पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा द्यायचा की भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना पाठिंबा द्यायचा. या संदर्भात कल्याणराव काळे लवकरच आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवणार आहेत. त्यामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरणार आहे. दरम्यान, आपण सध्या कामानिमित्त बाहेरगावी आहे. लवकरच माझी भूमिका स्पष्ट करेन असे कल्याणराव काळे यांनी सांगितले आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts