IMPIMP

Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

by bali123
bjp leader kirit somaiya allegations against housing minister and minister jitendra awhad about

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर राज्यात खळबळ उडाली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. 100 कोटी टार्गेटचे प्रकरण ताजे असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांनी अशाच पद्धतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग असून एक मोठं रॅकेट सुरु असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या kirit somaiya यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोमय्या यांनी सांगितले की, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावाचा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार ‘धक्का’, जाणून घ्या

तसेच गृहनिर्माण विभागातील वसुली रॅकेट संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. तसेच पोलिसांकडे देखील या वसुली रॅकेटचे पुरावे दिले असल्याची माहिती सोमय्या kirit somaiya यांनी दिली आहे.

Pravin Darekar : ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ केंद्राने राज्यात लक्ष घालावे

वसुली गँग अशी करते वसुली
किरीट सोमय्या kirit somaiya  यांनी सांगितले की, राज्यात सध्या 100 रुपये प्रति स्वेअरफूट असा एसआरए, म्हाडा आणि बिल्डरांसाठी दर चालत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरएमध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. यानंतर गृहमंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश देतात. यानंतर लगेच एसआरए असो किंवा म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात, असे सोमय्या यांनी सांगितले.

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts