IMPIMP

‘कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन…’

by Team Deccan Express
Nilesh Rane on Sanjay Raut | nilesh rane reaction on ed takes action shiv sena leader sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला पत्र लिहून थेट परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्यावर खंडणीचा आरोप केला. अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप वाझेंनी केला. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्याचं काम परब यांनी सांगितल्याचा दावा पत्रातून वाझेंनी केला आहे. तसेच अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब, त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकारी यांना दिला आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब Anil Parab यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे खंडणीचे उद्योग करत नाही.  दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. माझे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही, असे भावनिक स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.

परब Anil Parab यांनी बाळासाहेब ठाकरेंची थपथ घेऊन वाझेंनी केलेले आरोप फेटाळून लावल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली. यावर भाजपचे नेते निलेश राणे यानी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो पाकीट मी नाही मारलं तर पोलिसांनी सोडून द्यायचं का ? हीच शपथ कोर्टात घेतली तर जज हात पाय बांधून 6 महिन्याची पोलीस कस्टडी देतील. संज्या स्वत: बाईच्या लफड्यात अडकलाय. अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.

Read More : 

Radhakrushna Vikhe-Patil : ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय, केंद्रावर आरोप करा अन्…’

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Related Posts