IMPIMP

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

by bali123
bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi pok and kashmir

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता एका भाजप खासदाराने काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील, अशी टीका केली आहे. खासदार सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. भारत सरकारचे पाकिस्तानसंदर्भात असलेल्या धोरणावरून सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. एका ट्विटर युझरने काश्मीर प्रश्नी सुब्रमण्यम स्वामींना टॅग केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हि टीका केली आहे.

ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजप आमदारानं शेअर केली निमंत्रण पत्रिका !

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी
काश्मीर प्रश्नी शरणागती पत्करली आहे. पीओके आता विसरा. मला खात्री आहे की, काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लंडनमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेताना दिसतील,अशा प्रकारचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

POK वर ताबा मिळवणे विसरा
एका ट्विटर युझरने सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम स्वामी यांनी POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे समजत आहे. यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

तसेच, आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी narendra modi यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरसह दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असेलल्या अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी परिणामकारक चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्मिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यावरून सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts