IMPIMP

BJP MLA | रिसॉर्टवर जुगार खेळताना भाजप आमदारासह 13 जणांना रंगेहाथ पकडले; 7 तरुणींचा समावेश, दारूच्या बाटल्या आढळल्या

by bali123
bjp mla arrested in gambling and liquor with 13 others peoples in gujrat

पंचमहाल : सरकारसत्ता ऑनलाइन BJP MLA  | गुजरातमधील (Gujarat) पावागड (Pavagad) शहरालगत असलेल्या रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून जुगार (Gambling) खेळणाऱ्या एका भाजप आमदारांसह 13 जणांना अटक केली आहे. पंचमहाल पोलिसांनी (Panchmahal Police) गुरुवारी रात्री कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये 7 महिलांचाही समावेश आहे. केसरी सिंह सोलंकी (Kesari Singh Solanki) असं या भाजप आमदारांचे (BJP MLA) नाव आहे ते खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP MLA) आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांवर अवैधरित्या जुगार (Gambling illegally) खेळणं, कोरोनाचं नियम (Corona rules) न पाळणं आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनामुळे (Corona) अनेक ठिकाणी निर्बंध लावले आहेत, मात्र तरीही काही जणांकडून त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. पावागड (Pavagad) शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टवर जुगार (Gambling) खेळला जात असल्याची माहिती पंचमहाल पोलिसांना (Panchmahal Police) मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आमदार सोलंकी यांच्यासह २५ जण मद्यधुंद अवस्थेत जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि कसीनोचं सामान जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) निरीक्षक राजदीपसिंग जडेजा (Inspector Rajdeep Singh Jadeja) यांनी सांगितले. या सर्वाना अटक केली असून त्यामध्ये ७ महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा रिसॉर्ट आमदाराचाच असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकां (Gujarat Assembly Election) जवळ आल्या आहेत त्यातच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

Web Titel : bjp mla arrested in gambling and liquor with 13 others peoples in gujrat

Related Posts