IMPIMP

BJP MLA Atul Bhatkhalkar । ‘तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल’

by bali123
BJP MLA Atul Bhatkhalkar | bhaskar jadhavs name will be written tarmac table president bjp mla atul bhatkhalkar criticizes

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Atul Bhatkhalkar । आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (monsoon session of maharashtra assembly 2021) सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता. ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस भिडले होते. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी एक वर्षासाठी त्यांना निलंबन केलं आहे. यावरून आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे नाव डांबराने लिहिले जाईल, असा घणाघात भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अतुल भातखळकर बोलताना म्हणाले, ‘धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केली. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो. मात्र, शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझे निलंबन करण्यात आले असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

तसेच, ‘ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचे निलंबन केले तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी ‘अकेला देवेंद्र काफी है’, असं म्हणत आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय घडलं सभागृहात?

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानाने
मंजूर करण्यात आला आहे. यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भारतीय जनता
पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. भाजपा (BJP) आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभा
अध्यक्षांच्या माईकला हात लावला. भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी
मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन गोंधळ निर्माण केला. त्यावेळी,
धक्काबुक्की अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले गेलॆ.

Web Titel : BJP MLA Atul Bhatkhalkar | bhaskar jadhavs name will be written tarmac table president bjp mla atul bhatkhalkar criticizes

Related Posts