IMPIMP

‘सचिन वाझे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करायचे?’… म्हणून वाझेंना वाचवण्याचे प्रयत्न होत होते’, BJP नेत्याचा CM वर गंभीर आरोप

by bali123
bjp mla nitesh rane has criticized cm uddhav thackeray and minister aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ आढळून आल्यानंतर या गाडी मालकाचा मुंब्रा येथील खाडीत संशयास्पद मृतदेह सापडला होता. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यानंतर वाझेंना तात्काळ निलंबित करण्यात आले. सध्या सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरु असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वाझे यांना अटक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

सचिन वाझे यांची एनआयए चौकशी करत असताना भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रिपोर्टिंग करत होते. परमबीर सिंह यांना ते विचारत देखील नव्हते. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात होते, असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नितेश राणे यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रहात होते. ते वर्षावर का रहात होते ? वर्षा हे निवासस्थान कोणाचे आहे ? त्यांना वर्षा बंगल्यावर राहण्याची परवानगी कोणी दिली ? असे सवाल नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न; फक्त ‘या’ तीनच नेत्यांचीच उपस्थिती

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती. एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणात निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना नुकतीच अटक केली आहे. महाराष्ट्र एटीएस कडून मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. आता एनआयए अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्हीचा तपास करत आहे. सध्या सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत असून विशेष न्यायालयाने वाझेंना 3 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे.

Also Read:

सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे? असा सवाल करत नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts