IMPIMP

नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘आणखी किती थुंकणार आमच्यावर? त्यापेक्षा राज्य सरकारने जाहीर विष वाटप करावे’

by nagesh
bjp mla nitesh rane has criticized state governmen twitter

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयावरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा डाव सुरू झाला आहे. त्यात आता भाजप आमदार नितेश राणे  (Nitesh Rane) यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राणे यांनी ट्विट करत म्हणाले की, दोन दिवसापूर्वी मराठा आरक्षण रद्द, त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्र सरकारने 16,000 पदासाठी मेघा भरती जाहीर केली. अजुन किती थुंकणार आमच्यावर? असा सवाल उपस्थित करत सरकारने जाहीर विष वाटप करावे, या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतला असल्याची टाकी राणे Nitesh Rane यांनी केली आहे.

Nawab Malik on Maratha Reservation : ‘आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचे पाठबळ’

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

दरम्यान, राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील 100 टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. विविध संवर्गातील 16 हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. रुग्णसेवेशी निगडित 50 टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 100 टक्के पदभरतीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली गेली.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय झाला. आता गट क आणि ड संवर्गाची 12 हजार पदे भरली जातील. त्यात नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी 2000 पदे अशी एकूण 16 हजार पदे भरण्याची प्रक्रिया आठवडाभरात पुर्ण करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Also Read :

‘महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही’

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

Related Posts