IMPIMP

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

by bali123
bjp mla ravi rana sachin waze mansukh hiren death case maharashtra government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांना अटक करण्यात आली. या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी ज्या प्रमाणे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्याही जीवाला धोका असून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

रवी राणा यांनी व्हीडीओच्या माध्यमातून राज्य सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सचिन वाझे sachin vaze यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वाझेंना कोणी मदत केली, लवकरच समजेल
रवी राणा म्हणाले, सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर वाझे यांनी तपासात जी माहिती दिली आहे त्यावरुन येत्या काळात महाराष्ट्रात भूकंप होऊ शकतो. केवळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन हे प्रकरण संपणारे नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. या प्रकरणात सचिन वाझे यांना कोणी मदत केली हे देखील लवकरच समोर येणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांपासून वाझेंना दूर ठेवा
मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाली आहे. ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्यानुसार वाझे यांच्याही जीवाला धोका असल्याचे राणा यांनी सांगितले. वाझे यांच्या अटकेमुळे ‘मातोश्री’ अडचणीत असून वाझे यांच्या जीवाला धोका आहे. यामुळे सचिन वाझे यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवण्याची मागणी राणा यांनी केली आहे. तसेच एनआयएने पूर्ण लक्ष ठेवून वाझे यांना संरक्षण दिले पाहिजे.

वाझे यांच्या जीवाला धोका
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांतच त्यांची हत्या करण्यात आली. मनसुख हिरेन प्रमाणेच सचिन वाझे यांची हत्या होऊ शकते, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

Related Posts