IMPIMP

उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला ! चर्चांना उधाण

by amol
raj thackeray-udayanraje bhosale

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मुंबईत कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पंरतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचं सांगितलं जात आहे.

आज सायंकाळी 5 वाजता उदयनराजे भोसले त्यांच्या काही सहकाऱ्यासंह कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. दरम्यान उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचीही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती.
इतकंच नाही तर या संदर्भात त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही भेट घेतली होती.
यानंतर आता ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि राज ठाकरे यांची कृष्णकुंज वरील ही पहिलीच भेट होत आहे.
त्यामुळं या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यात आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे.
त्यामुळं आता या भेटीची आणखी चर्चा होताना दिसत आहे.

संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा; विदर्भातील आमदाराला मिळणार वन खातं ?

Mumbai News : महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; कोर्टात गेलं प्रकरण; शिवसेना पुन्हा अडचणीत ?

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले – ‘सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’

‘धनंजय मुंडे, मेहबुब शेख अन् आता संजय राठोड; कारवाई नेमकी का होत नाही ?’ : चंद्रकांत पाटील

Related Posts