IMPIMP

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

by bali123
bjp naveen kumar jindal reaction after ncp sharad pawar admitted to hospital

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. पोटात दुखत असल्यानं रविवारी (दि 28 मार्च) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. बुधवारी 31 मार्च रोजी पवारांवर एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे असंही मलिक म्हणाले होते. यानंतर आता रुग्णालयात दाखल झालेले शरद पवार लवकर बरे व्हावेत अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली. पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचाही यात समावेश आहे. अशात आता दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार (Navin Kumar) यांनी मात्र या आजारपणावरून पवारांवर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

नवीन कुमार यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध सचिन वाझे प्रकरणा (Sachin Vaze) सोबत जोडला आहे. एनआयएनं अटक केल्यापासून सचिन वाझे रोज काही ना काही नवीन खुलासे करत आहेत. यावरून भाष्य करत नवीन कुमार यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

काही ट्विट करत नवीन कुमार म्हणाले, सचिन वाझेनं एनआयए समोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं ? आता तर असं वाटतंय की, दाल में कुछ काला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है असं ते म्हणाले आहेत.

इतकंच नाही तर आपल्या आणखी एका ट्विटमध्ये, शरद पवारांच्या पोटदुखीमुळं पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं वाटतंय अशी खोचक टीकाही नवीन कुमार यांनी केली आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts