IMPIMP

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

by bali123
bjp opened their first ever account in kerala as a result of match fixing with inc pinarayi vijayan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे केरळमधील राजकारण चांगलेच तापले आहे. केरळची विधानसभा निवडणूक सत्ताधारी LDF, काँग्रेसप्रणीत UDF आणि भाजपाप्रणीत NDA या तीन प्रमुख आघाड्यांमध्ये होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री पिनरायी विजयन pinarayi vijayan यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून भाजपवर निशाणा साधला आहे.मुख्यमंत्री पिनरायी विजयन pinarayi vijayan यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, पाच वर्षांपूर्वी काँग्रेसबरोबर मॅच फिक्सिंग करून भाजपाने राज्यातील पहिली जागा जिंकली होती. यावेळी त्याचं हे खातं आम्ही नक्कीच बंद करू. तसेच, या निवडणुकीत भाजपाचा मतांचा वाटा कमी होईल.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

या अगोदर केरळमध्ये ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांच्यासाठी नरेंद्र मोदी स्वतः प्रचारासाठी आले होते. या प्रचारादरम्यान त्यांनी पिनरायी विजयन pinarayi vijayan सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये “केरळ सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट(एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावं वेगळी आहेत आणि दोन्ही आघाड्यांमधील मॅच फिक्सिंग हे केरळच्या राजकारणातील सर्वात वाईट रहस्य आहे.” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी पिनराई विजयन pinarayi vijayan सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांनी एलडीएफवर सुद्धा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी एलडीएफवर टीका करताना गोल्ड स्मगलिंग स्कॅन्डलचा उल्लेख देखील केला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयनच्या कार्यालयावर देखील आरोप करण्यात आले होते. “जूडासने चांदीच्या काही नाण्यांसाठी लॉर्ड क्राइस्टचा विश्वासघात केला होता… तशाचप्रकारे एलडीएफने देखील सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला.” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केरळमध्ये ६ एप्रिल रोजी मतदान करण्यात येणार आहे तर २ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts