IMPIMP

Pravin Darekar : ‘लॉकडाऊनमुळे आपण खड्यात गेलो असे म्हणत होता, मग आता Lockdown का ?’

by pranjalishirish
bjp pravin darekar attacking mode maharashtra lockdown uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  राज्यातील जनजीवन सुरळीत होत असताना कोरोनाची दुसरी लाट आली. राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन lockdown  लागणार की नाही याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्यास कडक निमय लागू करावे लागतील, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर अगदीच शेवटचा पर्याय म्हणजे लॉकडाऊन करावा लागेल असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. मात्र, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी लॉकडाऊनचा  lockdown विरोध करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

प्रविण दरेकर यांनी म्हटले, लॉकडाऊन केल्याने आपण खड्यात गेलो असं राज्यातील सत्ताधारी म्हणत होते. मग आता पुन्हा लॉकडाऊन कशासाठी करत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या पोटपाण्यावर परिणाम होणारा कोणताही निर्णय होणार असेल तर भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पहिल्या टप्प्यातच योग्य वेळी लॉकडाऊन  lockdown केला असता तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता. मात्र, तो योग्य पद्धतीने केला नसल्याने कोरोना वाढला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोरगरिबांना रोख स्वरुपात मदत करण्याची मागणी केली. हीच मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आम्ही त्यांच्या मताचे स्वागत करतो. राज्यातील सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्याचे मुख्य कारण सरकारमधील अंतर्गत कलह आणि समन्वयाचा अभाव. त्यामुळे कोरोनाचे नियोजन कोलमडले याची जबाबदारी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितले.

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाशिकमध्ये उपचाराअभावी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. नाशिकचा दौरा केला त्यावेळी समजले की बेड उपलब्ध होत नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो, परंतु फारसा उपयोग झाला नाही असे दरेकर यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि इतर लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय व्यवस्थेचा बळी पडलेल्या रुग्णाच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Related Posts