IMPIMP

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

by pranjalishirish
bjp pravin darekar slams ncp and mla rohit pawar on remdesivir injection issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचाही तुटवडा झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar  यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर येथील कार्यकर्त्यांना रेमडेसिव्हिर दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. याच मुद्यावरून दरेकर Pravin Darekar  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. दरेकर म्हणाले, ‘नवाब मलिक आता रोहित पवारांना हे इंजेक्शन कुठून चोरुन आणले हे विचारणार का ? मलिक हे खरंच निष्पक्ष असतील तर ते रोहित पवार यांच्यावर रेमडेसिव्हिर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का ? असा सवाल उपस्थित केला.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वाधिक आहे. तर देशभरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिले जात आहे, हे राजकारण नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून दरेकर यांनी पलटवार केला.

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

प्रवीण दरेकर Pravin Darekarयांनी ट्विट करून म्हटले, की ‘रेमडेसिव्हिरबाबत ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचे दिसून येते. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिव्हिर चोरून आणले आहेत का ? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावे!

Read More : 

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts

</