IMPIMP

दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर ‘घणघात’, म्हणाले – ‘स्व. बाळासाहेबांनी हिंदुत्त्वासाठी ‘मशाल’ पेटवली, मात्र त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे सत्तेवर असताना ही ‘मशाल’ विझली’

by Team Deccan Express
bjp pravin darekar slams shivsena uddhav thackeray on palghar mob lynching case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली असून रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. यावरुन भाजपचे नेते ठाकरे सरकारवर वारंवार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर pravin darekar यांनी आता पालघर साधू हत्याकांडावरून थेट शिवसेनेला लक्ष्य बनवले आहे. पालघर साधू हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण होत असून साधूंना अद्याप न्याय मिळालेला नाही. यावरुन त्यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचा राम कदमांवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत’

हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाची धार कमी झाली असावी, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी विझवली, त्याचा आता धूर दिसत असल्याची घणाघाती टीका दरेकर यांनी केली. राज्य सरकारवर या प्रकरणावरुन टीका करताना प्रविण दरेकर pravin darekar यांनी आज मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण देखील केले.

दोन साधू आणि चालकाची झाली होती हत्या
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 मध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणातील दोषींना कोणतीच शिक्षा झालेली नाही. हाच मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणात गतीने तपास पूर्ण करुन दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने उचलली नसल्याने आज एक वर्ष होऊन देखील या प्रकरणात अद्याप न्याय मिळालेला नाही, असे दरेकर pravin darekar म्हणाले.

बाळासाहेबांनी पेटवलेली मशाल विझली, आता फक्त धूर
या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना प्रविण दरेकर pravin darekar म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आज सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपले मौन सोडावं आणि सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, अशी मागणी दरेकर pravin darekar यांनी केली आहे.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts