IMPIMP

‘सचिन वाझेंची तात्काळ नार्को टेस्ट करा, खरा चेहरा समोर येईल’ – राम कदम

by bali123
bjp ram kadam slams thackeray government and shivsena over sachin vaze arrest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांझे sachin vaze यांचे नाव पुढे आले. या प्रकरणाचा तपास सध्या एनआयए (NIA) करीत आहे. या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे sachin vaze यांची तेरा तास चौकशी केल्यानंतर वाझे यांना अटक केली. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. वाझे काल सकाळी 11 वाजता एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्यांना अटक केल्यानंतर आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरुन भाजपने शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधाला आहे.

होऊ जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राम कदम यांनी ट्विट केले असून यामध्ये त्यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. राम कदम यांनी एका मागोमाग चार ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी, अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊ जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, असं म्हटलं आहे. तसेच अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पहात आहे ? नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरुन शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं देखील राम कदम यांनी म्हटले आहे.

सरकारने देशाची माफी मागावी
राम कदम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे, त्यांचे सरकार सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे संपूर्ण देशाने पाहिले. अखेर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली, आता तरी महाराष्ट्र सरकार देशाची माफी मागत सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करणार का ? असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. तसेच याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे देखील कदम यांनी म्हटले आहे.

सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अँटेलिया केस : NIA ची अ‍ॅक्शन ! ‘या’ कलमान्वये पोलिस अधिकारी सचिन वाझेंविरूध्द गुन्हा, जाणून घ्या

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक
MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

Related Posts