IMPIMP

‘हसन मुश्रीफ यांनी इतर जिल्ह्यातून निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावं’

by pranjalishirish
bjp slams rural development minister hasan mushrif for criticising chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन-  चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  हे पुण्याला पळून गेले आणि एका महिलेच्या जागेवर उभे रहावे लागले अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. यानंतर भाजपने मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रकांत पाटील यांचा प्रवास साऱ्या महाराष्ट्राभर होत असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात ते उमेदवारी करु शकतात. त्यामुळे निवडून येण्यासाठी पुण्याला पळून गेले असं म्हणण कितपत योग्य आहे, हे हसन मुश्रीफ यांनीच तपासाव. तसेच मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवावं, असं आव्हान भाजपने दिले आहे.

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे आहेत, कोल्हापूरातून पळून जावं लागलं, पुण्यात एका महिलेच्या जागेवर उभे रहावे लागले, यावरुन त्यांची लोकप्रियता समजते. तसेच कोल्हापूरातून पळून जावं लागलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. मुश्रीफ यांच्या टीकेला भाजपने प्रसिद्धी पत्रकातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

म्हणून चंद्रकांत पाटलांवर बेछूट आरोप

प्रसिद्धी पत्रकातून प्रत्तुत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, कोरोना महामारीत महाराष्ट्राला सावरण्यात आलेलं अपयश, सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार, गृहमंत्र्यांची पोलिसांकडे महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणीची मागणी, अशा अनेक प्रकरणांवरुन जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मुश्रीफ हे चंद्रकांत पाटील  Chandrakant Patil यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी हे पत्रक काढले आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

मुश्रीफ फक्त कोल्हापूरात दिसतात

पत्रकात म्हटले की, मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांचा पक्षावरील निष्ठेचा इतिहास तपासावा. कोरोना काळात दादा महाराष्ट्रभर सेवाकार्यासाठी फिरत आहेत. मुश्रीफ हे फक्त कोल्हापुरातच दिसत होते. कोरोना काळात चंद्रकांतदादांनी केलेले काम पाहून मुश्रीफ यांनी बोलावं, असेही भाजपने मुश्रीफ यांना सुनावले आहे. तसेच चंद्रकांत पाटील  Chandrakant Patil यांच्या बद्दल त्यांनी केलेल्या अर्वाच्च्य भाषेचा भाजपने निषेध केला आहे.

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

शरद पवारांच्या आजाराचे राजकारण करत आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली होती. ती मुश्रीफ यांनी ऐकली नसवी. शरद पवार यांच्या आजारपणाचे राजकारण तेच करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट थोपवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश येत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न मुश्रीफ हे करीत आहेत. त्यांनी राजकारण थांबवून कोरोनाची लाट थोपवावी आणि राज्यातील जनतेला वाचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजपने केले आहे.

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

Related Posts