IMPIMP

‘Facebook Live वर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आता तरी काही बोलतील का ?, भाजपचा सवाल

by pranjalishirish
Maharashtra Unlock | maharashtra unlock updates task force committee doctors give this suggestion to cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडाही जाणवत आहे, या सर्व बाबींवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावरून आता भाजपने ट्विट करून टीका केली. ‘फेसबुक लाईव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आतातरी काही बोलतील का?’ असे म्हटले आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात 7 जणांचा ऑक्सिनजनअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून भाजपने ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे ? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का ? फेसबुक लाईव्हवर मोठमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का?’, असे म्हटले आहे.

‘या’ कारणामुळं मोदींनी Lockdown लावला होता, आशिष शेलारांनी दिलं महाविकासला प्रत्युत्तर

तसेच राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत तर कुठे रेमडेसिव्हिरचा काळाबाजार आणि तरीही मुख्यमंत्री ठाकरे Uddhav Thackeray यांच्या मते सर्व आलबेल आहे, असेही म्हटले आहे.

‘ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे महावसुली सरकारच्या अनास्थेतून’, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल (व्हिडीओ)

‘घोळ आणि झोल हा तर किमान समान कार्यक्रम’

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच घोळ आणि झोल हे बहुतेक ठरले असावे. कोरोनाचे संकट थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली लुटालुटीचे नवीन धंदे सुरू आहेत. आता या सर्व गोष्टीला राजाचा आशीर्वाद आहे की त्याच्या मंत्र्यांचा हे त्यालाच ठाऊक, असेही सांगण्यात आले.

Read More : 

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts